Join Our WhatsApp Group

मोहम्मद शमीच्या भावाचा Ranji Trophy 2024 मध्ये तांडव. 150 च्या वेगाने गोलंदाजी करत 4 बळी घेतले.

Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024, भारतातील लाल चेंडू क्रिकेटची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा सुरू झाली आहे. येथे तरुणांसह अनेक अनुभवी खेळाडूंकडून शानदार कामगिरी केली जात आहे. त्यापैकी एक टीम इंडियाचा महान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा भाऊ आहे.

शमीचा भाऊ बंगालकडून रणजी ट्रॉफी खेळतो आणि शुक्रवारी त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामन्याची स्थिती कशी होती आणि या सामन्यात शमीच्या भावाने एकूण किती विकेट घेतल्या हे जाणून घेऊया.

VIDEO : आधी कर्णधारपदाचा राजीनामा, नंतर बॅटला गंज लागली, आता Babar Azam सिपंल कॅच सुद्धा पकडत नाहीये. हे पाहून गोलंदाजही संतापला.

मोहम्मद शमीच्या भावाने Ranji Trophy 2024 मध्ये खळबळ उडवून दिली

मोहम्मद शमी शस्त्रक्रियेनंतर पूर्ण तंदुरुस्त होण्याच्या प्रक्रियेतून जात असून सध्या तो खेळाच्या क्षेत्रापासून दूर आहे. पण दुसरीकडे, त्याच्यानंतर मोहम्मद कैफ रणजी ट्रॉफी मध्ये धुमाकूळ घालत आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशविरुद्ध त्याने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत 4 महत्त्वाचे बळी घेतले.

27 वर्षीय मोहम्मद कैफने 5.5 षटके टाकली आणि केवळ 14 धावा देत 4 बळी घेतले. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे उत्तर प्रदेशचा संघ अवघ्या 60 धावांवर गारद झाला. कैफला देशांतर्गत क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. हा त्याचा दुसरा प्रथम श्रेणी सामना आहे, तर त्याने आतापर्यंत फक्त 9 लिस्ट ए सामने खेळले आहेत.

SST20 : अशी कॅच आजवर क्रिकेट इतिहासात तुम्ही पाहिली नसेल. काळजाचा ठोका चुकवणारा झेल…

पहिल्या सामन्याची परिस्थिती

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बंगालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला आणि त्यांनी उत्तर प्रदेशचा संपूर्ण संघ 60 धावांत ऑलआऊट केला.

मोहम्मद कैफशिवाय सूरज सिंधू जैस्वालने 3 आणि इशान पोरेलने 2 बळी घेतले. यूपीकडून समर्थ सिंगने सर्वाधिक 13 धावा केल्या. त्याचवेळी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बंगालने 5 विकेट गमावून 95 धावा केल्या होत्या. श्रेयांश सिंग 37* आणि करण लाल 8* धावांवर नाबाद आहे. युपीकडून भुवनेश्वर कुमारने सर्व 5 विकेट घेतल्या आहेत.